मुंबई : महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मोहित कंबोजवर हल्ला बोल केला आहे. नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर ड्रग्स प्रकरणाला एक वेगळ वळणं लागणार असल्याची शक्यता नाकरता येत नाही. एवढंच नाही तर मलिकांनी आर्यन खानचं अपहरण असल्याचं सांगितलं आहे. एका सेल्फीमुळे सर्व खेळ बिघडला असल्याचं देखील मलिक म्हणाले. 'क्रूझवर झालेली ड्रग्सची कारवाई फर्जी आहे, आम्ही मागील सहा तारखेला सांगितले. भानुशाली आणि गोसावी फर्जी आहेत.'
मोहित कम्बोज प्रकरणाचा मास्टरमाईंड
नवाब म्हणतात, 'मोहित कंबोज 1100 कोटी रूपयांचा बँक घोटाळा करणारा व्यक्ती आहे. भाजप सरकारच्या आधी मोहीत काँग्रेस नेत्यांच्या मागे पुढे करायचा. सत्ता बदलल्यानंतर भाजपात सामिल झाला. पैसे देऊन दिंडोशीमधून निवडणूक लढवली. मोहित कंबोजने भाच्यामार्फत आर्यन खानला किडनॅप करण्याचा प्लॅन केला.
कम्बोज मुंबईत 12 हॉटेल चालवतो
मोहित कंबोज आणि वानखेडे यांचे चांगले संबंध आहेत. कंबोज मुंबईत 12 हॉटेल चालवतो. आपलं हॉटेल चालावण्यासाठी वानखेडे मार्फत इतर हॉटेलवर कारवाई करायला लावतो. 7 तारखेला मोहित कंबोज आणि वानखेडे यांची स्मशानभूमी बाहेर भेट झाली. एवढंच नाहीतर वानखेडे ड्रग्स माफियांना संरक्षण देतात असं देखील नवाब म्हणाले. वानखेडे यांच्या खाजगी आर्मीचा कम्बोज भाग असल्याचा खुलासा मलिकांनी केला. अखेर मलिक म्हणाले अखेर सत्य लपणार नाही. लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करू नका.
के पी गोसावी आणि त्यांचा साथीदार आत्मसमर्पण करणार होते
22 तारखेला मनोज संसारे यांचा मला फोन आला. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं के पी गोसावी आणि त्यांचा साथीदार आत्मसमर्पण करणार आहेत. याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील फोन केला. मुख्यमंत्र्यांनी डीजी पांडे यांना भेटण्यास सांगितले त्यांना मी माहिती दिली. संसारे यांना फोन केला तर ते बोलले त्यांचा फोन बंद लागतो.
'त्यानंतर मात्र मी परत डीजींना फोन केला नाही. त्यानंतर दुपारी माझ्याकडे दुपारच्या सुमारास मनोज संसारे आणि प्रभाकर सैल आले. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला पुणे क्राईम ब्रँचने अटक केली होती. त्यांनी माझं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं होतं. त्यांनतर मी मुंबईत आलो, असं मलिक म्हणाले.
दरम्यान, मुंबई ड्रग्स प्रकरणात तपास करणाऱ्या एनसीबीचे Zonal Director समीर वानखेडे यांना हाय प्रोफाईल आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणातून हटवण्यात आलं आहे. आता मुंबई ड्रग्स प्रकरणाची चौकशी दिल्ली एनसीबीकडून केला जाईल. संजय सिंह हे या तपासकामाचे प्रमुख असतील. आर्यन खान प्रकरणासह वानखेडे यांच्याकडून सहा प्रकरणांच्या चौकशीचे अधिकार कडून काढण्यात आले आहेत.