पंतप्रधान मोदी- मुख्यमंत्री ठाकरे यांची आज भेट, मराठा आरणक्षासाठी अशी आखली रणनीती

मराठा आरक्षणाच्या ( Maratha reservation) मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेणार आहेत.  

Updated: Jun 8, 2021, 08:29 AM IST
पंतप्रधान मोदी- मुख्यमंत्री ठाकरे यांची आज भेट, मराठा आरणक्षासाठी अशी आखली रणनीती  title=
संग्रहित छाया

मुंबई : मराठा आरक्षणाच्या ( Maratha reservation) मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीसाठी रवाना झालेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आता मुख्यमंत्र्यांनी थेट पंतप्रधानांची भेट घेऊन तिढा सोडवण्याची रणनीती आखली आहे. आज उद्धव ठाकरे हे मोदी यांची दिल्लीत जाऊन भेट घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी, अशी मागणी मुख्यमंत्री करणार असल्याची माहिती आहे. 

मुख्यमंत्र्यांसोबत चार जणांचं शिष्टमंडळही असणार आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा समावेश आहे.  या भेटीत कोकणातल्या वादळग्रस्तांच्या मदतीबाबतही चर्चा करणार आहेत. 

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान मोदी यांची भेट आज सकाळी 11 वाजता घेणार आहेत. या भेटीची उत्सुकता शिगेला  पोहोचली आहे. मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच या भेटीत कोकणातल्या वादळग्रस्तांच्या मदतीबाबतही चर्चा करणार आहेत. 

दरम्यान मुख्यमंत्री आज दिल्लीला रवाना होण्याआधी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर ही भेट झाली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंसह सरकारचं शिष्टमंडळ दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली.