मुंबई : राज्यात आजपासून (7 जून) विविध जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आलं आहे. अनलॉक केल्यामुळे कोरोना रुग्णांची वाढ होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र त्यानंतरही रुग्ण संख्येमध्ये राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट कायम आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 11 हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात एकूण 10 हजार 219 रुग्णांची नोंद झाली आहे. (10 thousand 219 corona positive patients were found in Maharashtra today June 7 2021)
किती रुग्ण बरे झाले?
दिवसभरात एकूण 21 हजार 81 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 154 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 55 लाख 64 हजार 348 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) हा 95.25% इतका झाला आहे. तर मृत्यूदर 1.72% इतका आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
*New Cases- 10,219
*Recoveries- 21,081
*Deaths- 154
*Active Cases- 1,74,320
*Total Cases till date - 58,42,000
*Total Recoveries till date - 55,64,348
*Total Deaths till date -1,00,470
*Total tests till date - 3,66,96,139(1/4)
— PIB in Maharashtra (@PIBMumbai) June 7, 2021
राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण किती
राज्यात 12 लाख 47 हजार 33 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच 6 हजार 232 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण 1 लाख 74 हजार 320 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. म्हणजेच इतके रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
संबंधित बातम्या :
पुण्यात सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आग, ७ जणांचा मृत्यू तर १७ बेपत्ता
मुंबईसह कोकणात 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा, मुख्यमंत्र्यांचे सतर्क राहण्याचे यंत्रणांना निर्देश