प्राध्यापकांच्या पगारात 22 ते 28 टक्क्यांनी वाढ होणार !

प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 11, 2017, 09:23 PM IST
प्राध्यापकांच्या पगारात 22 ते 28 टक्क्यांनी वाढ होणार ! title=

मुंबई : प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. देशातल्या 7 लाख 51 हजार प्राध्यापकांना याचा लाभ होणार आहे. देशातली 329 विद्यापीठे आणि 12 हजार 912 महाविद्यालयांना याचा लाभ होणार आहे.

तसंच केंद्राचं अनुदान मिळणा-या अभिमत विद्यापीठे आणि 43 केंद्रीय विद्यापीठांच्या प्राध्यापकांनाही याचा फायदा मिळणार आहे. 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. सातव्या वेतन आयोगामुळे प्राध्यापकांच्या पगारात 22 ते 28 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचीही माहिती जावडेकरांनी दिली आहे.