पंजाब बॅंक घोटाळा : मोदी, चोकसीचे पासपोर्ट निलंबित

११ हजार ४०० कोटी रुपयांच्या पंजाब बॅंक घोटाळाप्रकरणी सीबीआय आणि ईडीचे छापे सुरूच आहेत. मुंबईसह पुणे, जयपूर, सूरत, हैदराबाद आणि कोयंबतूरमध्ये असलेल्या नीरव मोदी आणि मेहूल चोकसीच्या घरं आणि दुकानांवर शुक्रवारी छापे टाकण्यात आले. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 17, 2018, 03:15 PM IST
पंजाब बॅंक घोटाळा : मोदी, चोकसीचे पासपोर्ट निलंबित title=

मुंबई : ११ हजार ४०० कोटी रुपयांच्या पंजाब बॅंक घोटाळाप्रकरणी सीबीआय आणि ईडीचे छापे सुरूच आहेत. मुंबईसह पुणे, जयपूर, सूरत, हैदराबाद आणि कोयंबतूरमध्ये असलेल्या नीरव मोदी आणि मेहूल चोकसीच्या घरं आणि दुकानांवर शुक्रवारी छापे टाकण्यात आले. 

तसंच मोदी आणि चोकसीचे पासपोर्ट ४ आठवड्यांसाठी निलंबित करण्यात आलेत. अंमलबजावणी संचालनालयाच्या विनंतीवरून परराष्ट्र मंत्रालयानं ही कारवाई केली असली तरी मोदी आणि चोकसी सध्या कुठे आहेत, याची माहिती नसल्याचं मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी सांगितलं.

नीरव मोदी, चोकसीसह नीरवचा भाऊ निशाल मोदी आणि पत्नी अमी मोदी यांच्याविरोधात इंटरपोलनंही लूकआउट नोटीस जारी केलीये.  दुसरीकडे यावरून राजकीय हेवेदावेही सुरूच आहेत.