ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न; राहुल शेवाळेंचा आरोप

शेवाळे यांनी यावेळी थेट आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे देखील नाव घेतले.  आपल्यावर आरोप करणा-या महिलेला आदित्य ठाकरेंची फूस असल्याचा दावा त्यांनी केलाय. ती महिला ही दाऊद गँगशी संबंधीत असून तीचं पाकिस्तानशी कनेक्शन आहे. त्यामुळे या प्रकरणाचा NIAकडून तपास केला जावा अशी मागणी शेवाळेंनी केली आहे. 

Updated: Dec 25, 2022, 05:22 PM IST
ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न; राहुल शेवाळेंचा आरोप title=

Maharashtra Politics: शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेचे शोषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यावरुनच ठाकरे गटाने बुडत्याचा पाय खोलात असं म्हणत शेवाळेंवर टीका केला आहे. ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून माझे राजकीय आणि वैयक्तीक आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केला आहे.  तसेच शेवाळे यांनी यावेळी थेट आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे देखील नाव घेतले. 
आपल्यावर आरोप करणा-या महिलेला आदित्य ठाकरेंची फूस असल्याचा दावा त्यांनी केलाय. ती महिला ही दाऊद गँगशी संबंधीत असून तीचं पाकिस्तानशी कनेक्शन आहे. त्यामुळे या प्रकरणाचा NIAकडून तपास केला जावा अशी मागणी शेवाळेंनी केली आहे. 

तर, ती महिला मुंबईत येईल आणि गुन्हा दाखल करेल, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केला आहे. राहुल शेवाळे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या जीवाला धोका असल्याचा दावा रुपाली पाटील यांनी केला आहे.  तसेच त्या महिलेला मुख्यमंत्र्यांनी संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी एका फॅशन डिझायनरचे शोषण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले. व्हायरल झालेल्या व्हिडिओत खासदार राहुल शेवाळे एका महिलेसोबत दिसत आहे, यावरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. यानंतर राहुल शेवाळी यांनी पत्रराप परिषद घेत आपली भूमिका मांडली. फेक अकाऊंटच्या माध्यमातून महिलेने मला ब्लॅकमेल केल्याचा दावा करत राहुल शेवाळे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. माझ्यावर आरोप करणारी महिला दोन वेळा कराचीला जाऊन आली आहे. या महिलेचे दाऊद आणि पाकिस्तानशी संबध आहेत. पाकिस्तानी एजंटच्या मदतीने तिने फेक अकाऊंट सुरू केलं होतं. या महिलेची पार्श्वभूमी गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे असंही राहुल शेवाळे म्हणाले. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूपूर्वी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी रिया चक्रवर्तीला अनेक फोन केल्याचा आरोप शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी बुधवारी केल्यानंतर खळबळ उडाली. राहुल शेवाळे यांच्या आरोपांनंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. सुशांत सिंग याच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीच्या मोबाइलवर 40 पेक्षा अधिक फोन आले होते. हा नंबर AU या नावाने तिच्या मोबाइलमध्ये होता. AU म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असा त्याचा अर्थ होता, अशी माहिती मला बिहार पोलिसांकडून मिळाली असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला होता. याबाबत चौकशी करण्याची मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे.