राज कुंद्रा प्रकरणात वाईट अडकली शिल्पा, अद्याप क्लीन चीट नाही

राज कुंद्रा यांची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीवरची ही मुंबई क्राईम ब्राँचने चौकशी केली आहे.

Updated: Jul 27, 2021, 10:05 PM IST
 राज कुंद्रा प्रकरणात वाईट अडकली शिल्पा, अद्याप क्लीन चीट नाही

मुंबई : राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राईम ब्राँच वेगाने तपास करत आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व लोकांची चौकशी सुरु आहे. राज कुंद्रा यांच्यासह अनेकांना पोलिसांनी अटकही केली आहे. राज कुंद्रा यांची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीवरची ही मुंबई क्राईम ब्राँचने चौकशी केली आहे.

 दरम्यान अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की , शिल्पा शेट्टीला अद्याप क्लीन चिट देण्यात आलेली नाही. याशिवाय क्राईम ब्राँचने राज कुंद्राच्या मेहुण्याला ही अटक केली आहे. राज कुंद्राचा मेहुणा प्रदीप बक्षी आणि अरविंद श्रीवास्तव उर्फ ​​यश ठाकूर यांनाही अटक केली आहे.

राज कुंद्राचा मेहुणा प्रदीप बक्षी याला फक्त चेहरा म्हणून वापरण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. पण  हॉटशॉट्सचं सर्व कामकाज हे स्वत: राज कुंद्राने पाहिलं आहे. त्याच्या अटकेनंतर काही पीडितांनी पोलिसांसोबत संपर्क साधला आहे आणि त्यांच्याकडे असलेली माहिती  दिली आहे.