राज साहेब लवकर बरे व्हा! महापौर किशोरी पेडणेकरांच्या सदिच्छा

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांना लवकर बरे व्हा आणि काळजी घ्या अशा सदिच्छा दिल्या आहेत. 

Updated: Oct 23, 2021, 10:13 PM IST
राज साहेब लवकर बरे व्हा! महापौर किशोरी पेडणेकरांच्या सदिच्छा

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांना लवकर बरे व्हा आणि काळजी घ्या अशा सदिच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी काही वेळापूर्वीच आली होती. राज ठाकरे हे लीलावती रुग्णालयातून उपचार घेऊन कृष्णकुंज परतले आहेत. आता ते 2 आठवडे होम क्वारंटाईन राहणार आहेत.

राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या आई यांचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला होता. कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांचं चेकअप करण्यात आलंय. डॉक्टरांनी त्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे.

राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सक्रीय दिसत आहेत. त्यांनी अनेक वेळा पुणे दौरा देखील केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेतला. पण त्यांची प्रकृती बरी नसल्याने इतर त्यांचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले होते.