राज ठाकरे आज काय बोलतील, याकडे सर्वांचं लक्ष

मनसेनं सुरु केलेल्या आंदोलनानंतर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदा त्यांची भूमिका मांडणार आहेत. 

Updated: Nov 4, 2017, 02:42 PM IST
राज ठाकरे आज काय बोलतील, याकडे सर्वांचं लक्ष title=

मुंबई : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेनं सुरु केलेल्या आंदोलनानंतर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदा त्यांची भूमिका मांडणार आहेत. 

एल्फिस्टन रोड रेल्वे पुलावर झालेली दुर्घटना, त्यानंतर चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेच्या प्रशासकीय कार्यालयावर मनसेने काढलेला संताप मोर्चा, रेल्वे हद्दीतील अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याचा रेल्वे प्रशासनाला दिलेला अल्टीमेटम, फेरीवाल्यांविरोधात आंदोलनाचे हिंसक पडसाद यावर राज ठाकरे काय बोलतील. 

तसेच, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासोबत झालेला मनसे कार्यकर्त्यांचा संघर्ष, मालाड इथं फेरीवाल्यांकडून मनसे कार्यकर्त्यांना झालेली मारहाण आणि दादर रेल्वे स्टेशन बाहेर फेरीवाला समर्थनार्थ मुंबई काँग्रेसने काढलेल्या मोर्चावर मनसेने केलेला हल्ला हा सर्व घटनाक्रम ताजा आहे. 

त्या पार्श्वभूमीवर राज कार्यकर्त्यांपुढे अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करतील. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. यावेळी राज काय बोलणार याकडं नजरा लागल्यात.