ईडी चौकशीनंतर राज ठाकरे भाजपप्रणित वक्तव्यांकडे वळले का? वाचा काय म्हणाले राज ठाकरे

ईडी चौकशीनंतर राज ठाकरे भाजपप्रणित वक्तव्यांकडे वळले अशी टीका सातत्याने करण्यात आली आहे

Updated: Jul 23, 2022, 07:54 PM IST
ईडी चौकशीनंतर राज ठाकरे भाजपप्रणित वक्तव्यांकडे वळले का? वाचा काय म्हणाले राज ठाकरे title=

Raj Thackeray Exclusive Interview : ईडी चौकशीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) भाजपप्रणित अशा वक्तव्यांकडे वळले आहेत अशी टीका सातत्याने विरोधकांकडून करण्यात येते. याबाबत बोलताना राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'झी 24 तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये याबाबत भाष्य केले आहे. ईडी चौकशीवरुन टीका करणाऱ्यांना राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ईडी चौकशी आणि भाजपचा (BJP) काय संबंध? मी त्या दिवशी ठाण्याच्या सभेत बोललो होतो ज्यावेळेला टीका करायची त्या वेळेला टीका करणार. पण समजा जर तिकडे काश्मीरमध्ये 370 कलम जर रद्द झालं तर त्यांचं अभिनंदन नाही करायचं का? त्यावर तुम्ही म्हणणार मी तिकडे गेलो? शरद पवारांशी जरा दोन शब्द बोललो की पवारांसोबत युती होते का? भाजपबाबत बोललो की भाजपसोबत युती होते का?, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेला बारामतीला आले तेव्हा शरदजी की उंगली पकडके मैं राजनिती मे आया असं ते म्हणाले होते. म्हणजे काय लगेच पवार आणि मोदी यांची युती झाली का? असेही राज ठाकरे म्हणाले. 

 राज ठाकरेंची चौकशी कशासाठी?

 राज ठाकरे यांची ईडीने 2019 मध्ये तब्बल नऊ तास चौकशी केली होती. आयएल अ‍ॅण्ड एफएस या खासगी वित्तीय पायाभूत संस्थेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार, अनियमिततेत ठाकरे यांचा सहभाग आहे का, हे तपासण्यासाठी ईडीने त्यांना नोटीस बजावली होती.