मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार चिमटा काढलाय. अर्थातच व्यंगचित्राच्या माध्यमातून. मध्यंतरी मोदींनी आपला फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. तोच धागा पकडून राज ठाकरेंनी मोदींवर व्यंगचित्रातून मार्मिक निशाणा साधलाय. एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील त्यांनी फटकारे लगावलेत. जातीयवादाची विषवल्ली महाराष्ट्र पोखरून काढतंय. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी तातडीनं ठोस कारवाई करण्याची गरज आहे, असा संदेश या व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी दिलाय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या व्यंगचित्रांसाठी प्रसिद्ध आहेत. चालू घडामोडींवर खोचकपणे नेमकं बोट ठेऊन अनेकांची खिल्ली उडवणं, हा तर त्यांचा डाव्या हाताचा खेळ... आपल्या व्यंगचित्रांतून ते अनेक कठीण आणि गुंतागुंतीच्या विषयांवर मार्मिकपणे भाष्य करतात... तेही हसण्या-खेळण्याच्या पद्धतीतून...