मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी सुरक्षा वाढवली. पोलिसांच्या कंट्रोल रुमला एका टॅक्सी चालकाने फोव करून दोन संशयित व्यक्ती अँटिलिया नेमकं कुठे आहे, असं विचारत होते (Antilia). पत्ता विचारणाऱ्या व्यक्तींच्या हातामध्ये बॅगही होत्या. हे पाहून त्या टॅक्सी चालकाने लगेचच मुंबई पोलिसांशी संपर्क साधला.
हा फोन आल्यानंतर लगेचच सुरक्षा यंत्रणा सजग झाल्या आणि अंबानींच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली. लगेचच सदर प्रकरणी तपास सुरु करण्यात आला आणि एका व्यक्तीला नवी मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं. प्राथमिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीला फक्त अंबानींचं आलिशान घर दुरून पाहायचं होतं. ज्यासाठीच तो पत्ता विचारत होता. ज्या वाहन चालकाला त्या व्यक्तीनं पत्ता विचारला ते वाहनही पोलिसांनी शोधलं. वॅगनर आर, या पद्धतीचं ते वाहन होतं. ज्या व्यक्तीला पत्ता विचारला तो व्यक्ती एक गुजराती टॅक्सी चालक होता.
सदर प्रकरणामध्ये प्राथमिक तपासातून कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नसल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, दाढिवाल्या व्यक्तीनं अंबानींच्या निवासस्थानाची चौकशी केल्याची माहिती मिळताच पोलीस सतर्क झाले. ज्यानंतर लगेचच या भागातील सुरक्षा वाढवण्यात आली. पण, सध्या चिंतेचं कारण नसल्याचीच माहिती समोर येत आहे.
मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून अंबानींच्या निवासस्थानावरील सुरक्षेत लक्षणीय वाढ करण्यात आली. अँटिलियाच्या संरक्षणाबाबत चिंता तेव्हा व्यक्त करण्यात आली जेव्हा, स्फोटकांनी भरलेली एक एसय़ूव्ही या निवासस्थानापासून काही अंतरावर आढळली होती.