मुंबई : मुंबईत कुठलेही वादळ येणार नसून सोशल मीडियावर केवळ अफवा पसरवल्या जात असल्याचा खुलासा हवामान खात्यानं केला आहे. सोशल मीडियावरील वादळाबाबत फिरणारे संदेश चुकीचे असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे.
मुंबईत कुठलेही चक्रीवादळ येणार नसल्याचंही स्पष्ट केलंय. तसंच मुंबईतला कुठलाही पूल अथवा रस्ता बंद करण्यात आलेला नाही. वांद्रेच्या एसव्ही रोडवर नॅशनल कॉलेजजवळ बंद पडलेल्या गाड्या असल्यानं तेथील वाहतूक वळवण्यात आल्याचं बीएमसीचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी सांगितलंय आहे. तसंच मुंबईत बीएमसीचे ३५ हजार कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.