नवा पक्ष स्थापन करण्याची सदाभाऊ खोतांची घोषणा

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केलीय. 

Updated: Sep 7, 2017, 06:14 PM IST
नवा पक्ष स्थापन करण्याची सदाभाऊ खोतांची घोषणा title=

मुंबई : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केलीय. 

२१ सप्टेंबरला घटस्थापनेच्या दिवशी नव्या पक्षाचं नाव आणि ध्येय-धोरणं ठरवणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तर नव्या संघटनेचा पहिला मेळावा ३० सप्टेंबरला घेणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. 

आपण स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडली नाही तर आपल्याला काढून टाकण्यात आलं. त्यामुळं आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून नव्या संघटनेच्या स्थापनेबाबत निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.