मुंबई : विशेष टाडा कोर्टाने आज १९९३ सालच्या मुंबई ब्लास्ट प्रकरणातील दोषींना शिक्षा सुनावली. कुख्यात डॉन अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा झाली.
अबू सालेम एका सामान्य कुटुंबातील मुलगा ते त्याचा कुख्यात गुंडापर्यंतचा प्रवास हा अतिशय रोमांचकारी आहे. अबू सालेमचा जन्म उत्तर प्रदेशच्या आजमगढ जिल्ह्यातील सराय मीर गावांत झाला आहे. सालेमने दिल्ली आणि मुंबईत टॅक्सी चालवली आहे. १९८९ मध्ये त्याची ओळख अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिमशी झाली. १९९३ सालातील बॉम्ब प्रकरणात सालेमचा मुख्य रोल होता.
अबू सालेमचा जन्म मीर गावात झाला. एका साधारण कुटुंबात जन्मलेला हा मुलगा पुढे कुख्यात गुंड होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. त्याचं संपूर्ण नाव अबू सालेम अब्दुल कय्यूम अन्सारी आहे. अबू सालेमचे वडिल पेशाने वकिल होते. ज्यांचा अपघातात मृत्यू झाला. घरात पैशाची तंगी असल्यामुळे अबू सालेमला अर्धवटच शिक्षण सोडावं लागलं आणि मॅकेनिकच्या दुकानात काम करावे लागले.
आजमगढमध्ये मॅकेनिकचं काम केल्यानंतर अबू सालेम दिल्लीत आपलं प्रस्थान हलवलं. दिल्लीत सालेमने अनेक दिवस टॅक्सी चालवून आपला गुजारा केला. त्यानंतर तो मुंबई या स्वप्ननगरीत आला. सालेमने मुंबईत देखील टॅक्सी चालवण्याचं काम केलं.
१९८९ साली टॅक्सी ड्रायवर सालेम असताना त्याची ओळख अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबत ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये फक्त सलाम-दुआ सारख्या गोष्टी होऊ लागल्या. हळू हळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि तो डी कंपनीमध्ये सहभागी झाला. लवकरच त्याची ओळख दाऊदचा सर्वात खास म्हणून होऊ लागली. सालेम दाऊदसाठी जमिनीचे व्यवहार आणि हत्यारांचे सप्लाय सारखी कामे करू लागला.
सुरूवातीला तो डी कंपनीत सामान्य मेंबरपणे होता. मात्र त्याच्या हुशारीने तो पुढे गेला आणि दाऊदचा खास माणूस बनला. मग बॉलिवूडमधील कलाकारांकडून पैसे घेणे, बिल्डरांना त्रास देणे यासारखी कामे तो करू लागला.