दोषी असेन,तर देहदंडाची शिक्षा द्या - संभाजी भिडे

दोषी असेन,तर देहदंडाची शिक्षा द्या, पण दंगलीचं सत्य समोर आलचं पाहिजे अस आज संभाजी भिडेंनी म्हटलंय.

Updated: Jan 5, 2018, 03:08 PM IST
दोषी असेन,तर देहदंडाची शिक्षा द्या -  संभाजी भिडे title=

मुंबई : दोषी असेन,तर देहदंडाची शिक्षा द्या, पण दंगलीचं सत्य समोर आलचं पाहिजे अस आज संभाजी भिडेंनी म्हटलंय. अॅट्रोसिटीमुळे लोकशाहीचा खून होत असल्याचं सांगून भिडेंनी त्यांच्यावर लावण्यात आलेला चिथावणीचा आरोपही फेटाळून लावाला. 

भीमा कोरेगावमध्ये दंगल भडकल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर आज संभाजी भिडेंनी मीडियासमोर प्रथमच सविस्तर प्रतिक्रिया दिली. 

यावेळी वढू-बुद्रुकमध्ये गेल्या तीन चार वर्षात फिरकलोच नाही असंही संभाजी भिडेंनी म्हटलंय. जे घडलं, ते महाराष्ट्राला कंलक लावणारं आहे,त्यामुळे दोषी कोण हे समोर आलचं पाहिजे असं यावेळी भिडे यांनी म्हटलंय.