मुंबई : सात वर्षात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा आवाज ऐकला, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. एक वर्षापूर्वी केले असते तर अनेक शेतक-यांचे जीव वाचले असते, अशी खंत देखील संजय राऊतांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरूनानक जयंतीनिमित्त देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी घोषणा केली. यादरम्यान त्यांनी मोठी घोषणा करत सुधारित कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. यूपीच्या तीन दिवसीय दौऱ्यापूर्वी पीएम मोदींनी कृषी कायदे परत करण्याची घोषणा केली. पीएम मोदी आज तीन दिवसांच्या यूपीच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
पंजाब व हरयाणात पराभवाची भिती होती म्हणून हे कायदे मागे घेतले गेलेत. यामागे राजकारणच आहे. असं देखील मोदी म्हणाले. हा शेतक-यांचा विजय आहे. शेतक-यांना खलिस्तानी, पाकिस्तानी म्हटले गेले होते. आता विरोधकांची एकजूट दिसून आली.
सात वर्षात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा आवाज ऐकला, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. एक वर्षापूर्वी केले असते तर अनेक शेतक-यांचे जीव वाचले असते, असं देखील राऊत म्हणाले.