नवी दिल्ली : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे आभार मानले. संजय राऊत यांच्यावर ईडीच्या कारवाईमुळे (ED Action) ते अडचणीत आले आहेत. ईडीने राऊत यांची अलिबागमधील संपत्ती जप्त केली आहे. ज्यामध्ये काही प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटचा समावेश आहे. आज शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची (PM modi) भेट घेतली. राऊतांवर अन्याय होत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
'पवार साहेबांचे आभार'
संजय राऊत म्हणाले की, मी पवार साहेबांचा आभारी आहे. माझ्या विषयी त्यांना पंतप्रधानांकडे बाजू मांडल. प्रश्न संजय राऊतांचा नाहीये तर अनेक नेत्यांवर चुकीच्या पद्धतीने कारवाया सुरू आहेत. जिथे जिथे विरोधी पक्षांचे सरकार आहे एक प्रकारे त्या सर्व विरोधकांचे प्रतिनिधित्व पवार साहेबांनी केलं.'
माझ्या सारख्या माणसाला राज्यसभेत बोलू दिले जात नाही. देशाच्या स्वातंत्र्याचा नवीन लढा सुरू झाला आहे.
'आयएनएस विक्रांतच्या नावावर कोट्यावधी गोळा केले. फडणवीस (Devendra Fadnavis) आयएनएस विक्रांत घोटाळा करणा-या किरीट सोमय्या यांची वकीली करत होते. हे पाहून आश्चर्य वाटले. ते या घोटाळ्याचे समर्थन करत होते. हे शिवाजी महारांजांच्या महाराष्ट्राचे दुर्देव आहे. अनेक सैनिकांचे बलिदान विक्रांतने पाहिला आहे. पुरावे कुठे आहेत असे मुर्खांसारखे बोलणा-याची बाजू नकली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते करत आहेत.' अशी टीका ही राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी फडणवीस यांना नकली हिंदुत्ववादी म्हटलं आहे.