"राजकीय घडामोडींमध्ये नक्कीच...", ईडीचं समन्स आल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीकडून समन्स पुन्हा एकदा समन्स आला आहे. चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या समन्समध्ये देण्यात आले आहेत. 

Updated: Jul 20, 2022, 12:40 PM IST
"राजकीय घडामोडींमध्ये नक्कीच...", ईडीचं समन्स आल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया title=

Sanjay Raut  ED Summons: शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीकडून समन्स पुन्हा एकदा समन्स आला आहे. चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या समन्समध्ये देण्यात आले आहेत. राज्यातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बजावलेली ही नोटीस महत्त्वाची मानली जात आहे. 

"या राजकीय घडामोडींमध्ये नक्कीच मला ईडीची समन्स येईल, ही अपेक्षा होतीच. त्यानुसार मला समन्स आलं आहे. ते काय मी अद्याप पाहिलं नाही कारण मी दिल्लीत आहे. या घडामोडींमध्ये व्यस्त आहे आणि व्यस्तच राहिन. पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पुढली तारीख द्यावी, अशी विनंती आमचे वकील करतील. जेव्हा जेव्हा मला अशा प्रकारचं समन्स आलं आहे. तेव्हा मी या देशाचं नागरिक म्हणून, एक खासदार म्हणून माझं कर्तव्य समजतो. त्या एजन्सीचा आदर करणं. जरी मला वाटत असलं की चुकीचं आहे. राजकीय दबावापोटी केलं जात आहे किंवा या राजकीय घडामोडींचा भाग म्हणून होत आहे. तरी ज्या यंत्रणांना जी माहिती हवी असते, ती देण्यासाठी उपलब्ध असतो. यावेळेलाही जाईन." असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

यापूर्वी ईडीने 1 जुलै रोजी संजय राऊत यांची तब्बल 10 तास चौकशी केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी ईडीने संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली होती.