15 फेब्रुवारीपासून मुंबईतील शाळा-कॉलेज सुरू होण्याची शक्यता

27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळाही सुरू करण्यात आल्या आहेत.

Updated: Feb 6, 2021, 09:25 AM IST
15 फेब्रुवारीपासून मुंबईतील शाळा-कॉलेज सुरू होण्याची शक्यता title=

मुंबई : मुंबईतल्या शाळांची घंटा लवकरच वाजणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातल्या शाळा-कॉलेजेस सुरू करण्याबाबत महापालिका शिक्षण विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. 15 फेब्रुवारीपासून शाळा-कॉलेज सुरू करण्याचा विचार असल्याचं समजतं आहे. प्रस्ताव मंजुरीसाठी पुन्हा एकदा मनपा आयुक्तांसमोर ठेवण्यात येणार आहे. सोमवारपर्यंत यावर निर्णय येण्याची शक्यता आहे. 

मुंबई, ठाणे, पालघर सोडून अन्य जिह्यांमध्ये 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा-कॉलेज कधी सुरू होणार याबाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना प्रश्न होता. 

कोरोनामुळे सध्या ऑनलाईन वर्ग भरत आहेत. मात्र आता लवकरच शाळा सुरु होणार आहेत. १५ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष वर्ग भरण्याची शक्यता आहे. 16 जानेवारीपासून देशरात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. लसीकरण (Corona vaccination) मोहिमेनंतर राज्यात अन्य जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु करण्यात आल्या. सुरुवातीला विद्यार्थी आणि पालकांनी अल्प प्रतिसाद दिला असला तरी हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.

कोरोनामुळे मार्चपासून बंद असलेल्या शाळा काही ठिकाणी क्वारंटाईन सेंटरसाठी ताब्यात घेण्यात आल्या होत्या. शाळा सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव तयार झाला असून मुंबईतील शाळा सुरु करण्याबाबत चाचपणी सुरु झाली आहे.