महिलेला व्हाट्सअॅपवर पाठवला चुंबनवाला इमोजी, पोलिसांनी केली अटक

दिल्ली येथील एका महिलेला व्हाट्सअॅपच्या माध्यमातून चुंबनवाला इमोजी पाठवल्याबद्दल मुंबई पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीवर लैंगिक छळाचा आरोप ठेवण्यात आला आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 21, 2018, 05:48 PM IST
महिलेला व्हाट्सअॅपवर पाठवला चुंबनवाला इमोजी, पोलिसांनी केली अटक

मुंबई: दिल्ली येथील एका महिलेला व्हाट्सअॅपच्या माध्यमातून चुंबनवाला इमोजी पाठवल्याबद्दल मुंबई पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीवर लैंगिक छळाचा आरोप ठेवण्यात आला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने केला हस्तक्षेप

एंजल इन्वेस्टर महेश मूर्ती असे मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, मूर्ती यांनी आपला बचाव करताना म्हटले आहे की, आपण केवळ व्हाट्सॅपवरच चुंबनवाला इमोजी पाठवला होता. राष्ट्रीय महिला आयोगाने हस्तक्षेप केल्यावर खार पोलिसांनी गेल्या २९ डिसेंबरला या प्रकरणात मूर्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पीडित महिलेने महिला आयोगाकडे मूर्ती विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर खार पोलिसंनी दोन्ही बाजूंचे म्हणने ऐकूण घेतले आहे. त्यानंतर चार्जशीट दाखल करण्यासाठी पोलीस पुरावा शोधत आहेत.

आपण पीडितेला ओळखतच नव्हतो - मूर्ती

दरम्यान, पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिलेली माहिती अशी की, त्यांनी मूर्ती यांचा जबाब दोन वेळा घेतला आहे. तसेच, दोन्ही वेळा त्यांनी म्हटले आहे की, मी इमोजी पाठवला पण, आपण पीडितेला ओळखतच नव्हतो. दरम्यान, तक्रारदार महिलेने मूर्ती यांच्यावर आक्षेपार्ह आणि अपमानास्पद तसेच, सेक्शुअल कमेंट आणि अश्लिल इशारा केल्याचा आरोप ठेवला आहे. दुसऱ्या बाजूला मूर्ती यांनी म्हटले आहे की, आपण तक्रारदार महिलेला कधी भेटलो नाही. केवळ सोशल नेटवर्किंग साईट्वरूच आपण त्यांना ओळखत होतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

आपण माफी मागितली व तिनेही त्याचा स्विकार केला

खार पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मूर्तीच्या हवाल्यानुसार म्हटले आहे की, संबंधीत महिलेने २५ डिसेंबर २०१६ ला ख्रिसमसच्या शुभेच्छा देणारा संदेश पाठवला होता. त्यात लिपवाला इमोजी पाठवला होता. त्यामुले आपण केवळ त्याचे उत्तर दिले. महिलेला या उत्तरावर आक्षेप होता. मला याची माहिती मिळताच आपण माफी मागितली व तिनेही त्याचा स्विकार केला.