पराभूत होऊनही अटल बिहारीजींनी माझं अभिनंदन केलं- शरद पवार

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी आपल दु:ख व्यक्त केलंय. 

Updated: Aug 16, 2018, 06:00 PM IST
पराभूत होऊनही अटल बिहारीजींनी माझं अभिनंदन केलं- शरद पवार  title=

मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच काही वेळापूर्वी निधन झालं. एम्स रुग्णालयात वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले ३६ तास ते मृत्यूशी झुंज देत होते. अनेक ज्येष्ठ नेते त्यांना भेटण्यासाठी एम्स रुग्णालयात येत होते. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी आपल दु:ख व्यक्त केलंय. एक महान व्यक्ती आपल्यापासून दूर गेली आहे.

काय म्हणाले पवार ?

एक अत्यंत सभ्य, सुसंस्कृत, साहित्याची जाण असलेलं व्यक्तीमत्व होतं. वाजपेयी पंतप्रधान असताना देशाची विरोधी पक्षाची जबाबदारी माझ्याकडे होती. त्यावेळी एका मताने आम्ही त्यांचा पराभव केला. राजीनामा दिल्यानंतर ते घरी गेल्यानंतर रात्री घरी गेल्यानंतर त्यांनी मला फोन केला आणि संसदीय मार्गाने पराभव केल्याबद्दल माझ अभिनंदन त्यांनी केलं. त्यातून सुसंकृतपणाचा आदर्श मी अनुभवला. मी माझ्या पक्षाच्यावतीनं दु:ख व्यक्त करतो असे शरद पवार यांनी सांगितले.