close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

VIDEO : शरद पवारांच्या म्हणण्यानुसार हे आहेत पंतप्रधानपदाचे पुढचे दावेदार...

शरद पवार हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा दावेदार मानत नाहीत तर...

Updated: Apr 27, 2019, 12:34 PM IST
VIDEO : शरद पवारांच्या म्हणण्यानुसार हे आहेत पंतप्रधानपदाचे पुढचे दावेदार...

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावाचा पंतप्रधानपदाच्या दावेदारीची चर्चा 'उगाचच' असल्याचं म्हटलंय. निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर एनडीएविरोधी दलांच्या नेत्यांमधला एक सर्वसामान्य चेहरात पंतप्रधानपदाच्या खुर्चीचा दावेदार असेल, अशी भाकीत शरद पवार यांनी वर्तवलंय. शरद पवार यांनी एनडीएविरोधी दलांच्या मजबूत स्थितीत मायावती, ममता बॅनर्जी आणि चंद्राबाबू नायडू असे चेहरे पंतप्रधानपदाच्या खुर्चीचे दावेदार असतील, असं म्हटलंय. ते 'झी न्यूज'शी संवाद साधत होते. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते नवीन सरकार बनवण्यासाठी भाजपाविरोधी दलांना एकजूट करून स्थिर सरकार देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलंय. अशा परिस्थितीत एनडीएच्या घटकांनाही सोबत आणण्याचे संकेत पवारांनी दिलेत. 

इथे पाहा शरद पवारांची EXCLUSIVE मुलाखत 

सर्वांना सोबत घेतल्यानंतर मॅजिक फिगर आमच्याकडे असेल. त्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी नीति काय असेल यासाठी सर्वांची मतं विचारात घेतली जातील. ज्यांच्याकडे मोठा आकडा असेल त्यांचं सरकार बनवण्यासाठी प्रयत्न करू आणि यासाठी माझ्यासारख्या व्यक्तीला लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण मी स्वत:ला दावेदार मानत नाही... आणि स्वत:साठी कोणतीही अपेक्षा ठेवत नाही. माझ्या अनुभवासहीत ज्यांचं सरकार बनवलं जाईल ते सरकार चालवण्यासाठी मी त्यांच्या पाठिशी राहील, असंही पवारांनी म्हटलंय.