विधान परिषदेसाठी युतीचं जमलं आघाडीचं बिघडलं

मराठवाड्यातल्या एका जागेवरून काँग्रेस राष्ट्रवादीतील आघाडीत बिघाडी झालीय. लातूर-बीड-उस्मानाबादच्या जागेवर दोन्ही पक्षांनी दावा केला होता.

Updated: May 2, 2018, 03:22 PM IST
विधान परिषदेसाठी युतीचं जमलं आघाडीचं बिघडलं title=

मुंबई : स्वबळाची भाषा करणा-या शिवसेनेनं विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा तलवार म्यान केल्याचं पुढं आलं आहे. शिवसेना - भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब झालंय. शिवसेनेनं तीन जागांवर आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर आता भाजपही उरलेल्या तीन जागांवर आपले उमेदवार जाहीर करणार आहेत.

सत्तेचा खाऊ मिळून खाऊ

प्राप्त माहितीनुसार, 3 जागांवर शिवसेनेचे उमेदवार जाहीर झालेत. तर 3 जागांवर भाजप उमेदवार देणार आहे. नाशिक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि परभणी-हिंगोलीतून शिवसेनेचे उमेदवार जाहीर झालेत. तर उस्मानाबाद-लातूर-बीड, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीतून भाजप लढणार आहे.

आघाडीत बिघाडी

दरम्यान, मराठवाड्यातल्या एका जागेवरून काँग्रेस राष्ट्रवादीतील आघाडीत बिघाडी झालीय. लातूर-बीड-उस्मानाबादच्या जागेवर दोन्ही पक्षांनी दावा केला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपमधून स्वगृही परतलेल्या रमेश कराड यांना उमेदवारी जाही केली. त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसनंही राज किशोर मोदी यांना उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे आता सर्वच ठिकाणी तिरंगी लढत रंगणार आहेत.