Dussehara Melava 2022 : शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानात यंदा दसरा मेळावा (Dussehara Melava) घेण्यासाठी कोणालाच परवानगी न मिळण्याची शक्यता आहे. दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटाने (Shinde Group) मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. पण दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटापैकी (Shinde Group) कुणालाच परवानगी न देण्याची भूमिका मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) घेतली आहे.
खरी शिवसेना (Shivsena) कुणाची, वाद कोर्टात प्रलंबित आहे. कुणाचा अर्ज अधिकृत हे पालिका ठरवू शकत नाही, त्यामुळं कोणत्याही गटाला परवागनी देऊ नये अशी महापालिकेची भूमिका आहे. याविरोधात शिवसेनेने कोर्टात धाव घेतली आहे. रितसर परवानगी मागूनही महापालिकेने परवानगी नाकारल्याचं शिवसेना ठाकरे गटाचं म्हणणं आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवरील दसरा मेळव्याचा फैसला उद्या हायकोर्टात होणार आहे.
दरम्यान, दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असा निर्धार शिवसेनेनं केलाय. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. बाळासाहेब ठाकरे कारच्या टपावर उभं राहून भाषण करतानाचा हा फोटो आहे. या फोटोखाली त्यांनी कॅप्शन दिलं आहे. त्यात लिहिलंय, आतुरता दसरा मेळाव्याची. पुनरावृत्ती होणारच. या फोटोमुळे शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आक्रमक असल्याचं दिसतंय. त्यामुळे गनिमि काव्याने शिवसेनेचा दसरा मेळावा होणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
आतुरता दसरा मेळाव्याची.....
पुनरावृत्ती होणार......#जात_गोत्र_धर्म #शिवसेना pic.twitter.com/ZYBGy8wdvm— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 22, 2022
महापालिकेनं परवानगी का नाकारली?
मुंबई महापालिकेनं मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) अभिप्राय मागवला होता. त्यानुसार गणपती विसर्जन मिरवणूकीच्यावेळी दादर आणि प्रभादेवीमध्ये काही दिवसांपूर्वी शिवसैनिक आणि शिंदे गट यांच्यात राडा झाला होता. शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर (MLA Sada Sarvankar) यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यावरुनही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळेच परवानगी नाकरण्यात आल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
दरम्यान, दसरा मेळाव्याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल मुंबईत सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी भाजपसह एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर ही टीका केली आहे. 'मुलं पळवणारी टोळी ऐकली पण आता बाप पळवणारे आता दिसतात. अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. त्यांना मुंबई बळकावयाची आहे. मुंबईवर लचके तोडणारी गिधाडं फिरू लागली आहेत. अमित शहा म्हणाले सेनेला जमीन दाखवा. पण त्यांना माहिती नाही की इथल्या जमिनीत तलवारीची पाती आहेत. मुंबई आमच्यासाठी मातृभूमी आहे. अशी टीका त्यांनी अमित शाह यांच्यावर केली आहे.