भाजपला जोरदार टोला, संबंध सुधारण्यासाठी भाजपने महान माणूस नेमला - संजय राऊत

Sanjay Raut : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु झाली. संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी राणे आणि भाजपला जोरदार टोला लगावला आहे.  

Updated: Aug 27, 2021, 11:35 AM IST
भाजपला जोरदार टोला, संबंध सुधारण्यासाठी भाजपने महान माणूस नेमला - संजय राऊत title=
Pic Courtesy: ANI

मुंबई : Sanjay Raut again criticized on BJP : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु झाली. मात्र, राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यात जोरदार राडा पाहायला मिळाला. यानंतर राणे यांना अटक झाली आणि त्यांची ही यात्रा स्थगित करण्यात आली. आज पुन्हा ही यात्रा सुरु झाल्यानंतर शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे.

जनआशीर्वाद यात्रा : प्रवीण दरेकर यांचा कोकण दौरा अचानक रद्द...

शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी राणे आणि भाजपला जोरदार टोला लगावला आहे. संबंध सुधारण्यासाठी भाजपने महान माणूस नेमला. राजकारण चांगल्या हेतूने आणि चांगल्या भाषेत व्हायला पाहिजे. टीका जरुर धार असावी. शिवसेना भाजपात कधी एकमेकांवर धावून जाण्याचा प्रसंग आला नाही. मात्र, बाहेरुन आलेल्यांकडून ते काम होत आहे, असे संजय राऊत म्हणाले. (Shiv Sena Leader Sanjay Raut again criticized on BJP)

भाजपमध्ये बाहेरुन आलेल्यांमुळे शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. पंतप्रधानांनी जनआशीर्वाद यात्रा का काढयला सांगितली. तर ती नव्या मंत्र्यांकडून सरकारच्या कार्यक्रमांची माहीती देण्यास सांगितली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चिखलफेक करायला सांगितलेली नाही. म्हणजे ते मोदी यांच्या आदेशाचे पालन करत नाहीत, असे संजय राऊत म्हणाले. 

 टीकेला धार असेल तरी चालेल. मात्र, तुम्ही कमरेखालील वार कराल तर ते खपवून घेतले जाणार नाही. बाहेरचा माणूस येतो आणि शिवसेनेला आणि शिवसेना प्रमुखाला टपल्या मारुन जातो, हे कधीही खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

दरम्यान, रत्नागिरीत आज राणे दाखल झाले आहे. त्यांना शिवसेनेकडून इशारा देण्यात आला आहे. आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही नक्की प्रत्युत्तर देणार असे शिवसेना आमदार राजन साळवी यांनी म्हटले आहे. आमच्या पक्ष नेतृत्वावर टीका केल्यास आम्ही आरेला कारेनं उत्तर देऊ, असे साळवी यांनी म्हटले आहे. राणे यांची यात्र आजपासून पुन्हा सुरू होणार असून सध्या कोकणातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचं लक्ष आहे.