Shiv Sena Crisis : मीही गुवाहाटीला जाऊ शकलो असतो...पण - संजय राऊत

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना सुनावले आहे. राऊत म्हणाले, मीही गुवाहाटीला जाऊ शकलो असतो. पण मी गेलो नाही. (Shiv Sena leader Sanjay Raut has made a big claim)  

Updated: Jul 2, 2022, 01:40 PM IST
Shiv Sena Crisis : मीही गुवाहाटीला जाऊ शकलो असतो...पण - संजय राऊत title=

मुंबई : Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना सुनावले आहे. राऊत म्हणाले, मीही गुवाहाटीला जाऊ शकलो असतो. पण मी गेलो नाही. (Shiv Sena leader Sanjay Raut has made a big claim) कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सैनिक आहे. म्हणून मी तिथे गेलो नाही. जेव्हा सत्य तुमच्या बाजुने आहे, तेव्हा घाबरायचं कशाला?, असे ईडी कारवाईवर ते म्हणाले. एक जबाबदार नागरिक आणि खासदार म्हणून, एखाद्या तपास संस्थेने (ED) मला समन्स बजावल्यास हजर राहणे माझे कर्तव्य आहे. गरज पडल्यास मी पुन्हा जाऊ शकतो, असे संजय राऊत यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. 29 जून रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडले आणि दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली. राऊत यांनी आता असा दावा केला आहे की, बंडखोर आमदारांमध्ये साहभागी होण्याची आणि गुवाहाटीला जाऊ शकलो असतो. परंतु पक्षाचे प्रमुख आणि संस्थापक बाळ ठाकरे यांचा अनुयायी असल्याने तसं मी काहीही केलेलं नाही.

पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर काही दिवसांतच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. शिसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी शिंदे यांना पाठिंबा देत त्यांचे समर्थन केले. ज्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. ज्यामध्ये शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे घटक पक्ष एकत्र होते. राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

भाजपने केंद्रातील सत्तेचा आणि मोठा गैरवापर केल्याचा आरोपही शिवसेनेने केला आहे. विरोधी पक्षांना संपवून लोकशाही कशी टिकेल, असा सवाल शिवसेनेने केला. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, मुख्यमंत्रिपद देण्यावरुन प्रचंड मतभेद झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे मार्ग वेगळे झाले होते.