मुंबई : आज शिवसेना आमदारांची मुंबईत बैठक घेण्यात आली. या बैठकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यासंदर्भात काही निर्णय यात घेण्यात आले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिवेशनात पक्षाची छाप पडेल असे मुद्दे उपस्थित करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या आमदारांना सूचना दिल्या आहेत. शेतकर्यांचे न सुटलेले प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात मांडा. कर्जमाफी जाहीर केली मात्र त्याचा लाभ शेतकर्यांपर्यंत पोहचला नसेल तर त्याबाबत आवाज उठवा, असेही आदेश आमदारांना देण्यात आल्याचे समजते.
निवडणुकीत दिलेल्या आणि पूर्ण न झालेल्या आश्वासनांबाबत आवाज उठवा, असे उद्धव ठाकरेंनी आमदारांना आदेश दिल्याची सूत्रांची माहिती आहे.