रेड एफएम ९३.५ वर 'त्या' गाण्यावरुन कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी

रेड एफएम 93.5 या रेडिओ चॅनेलने मुंबई महानगरपालिकेची बदनामी केल्याबद्दल नगरसेवक समाधान सरवणकर आणि अमेय घोले यांनी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. या भेटीत रेडिओ चॅनेलवर कायदेशीर कारवाई करून अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Updated: Jul 19, 2017, 10:26 AM IST
रेड एफएम ९३.५ वर 'त्या' गाण्यावरुन कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी title=

मुंबई : रेड एफएम 93.5 या रेडिओ चॅनेलने मुंबई महानगरपालिकेची बदनामी केल्याबद्दल नगरसेवक समाधान सरवणकर आणि अमेय घोले यांनी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. या भेटीत रेडिओ चॅनेलवर कायदेशीर कारवाई करून अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची मागणी केली आहे.

रेड एफएमची आरजे मलिष्काचे हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं. हे गाणं शिवसेनेला चांगलंच झोंबलं. त्यामुळे एरवी भाजपला शिंगावर घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेनेला मलिष्काला प्रत्युत्तर देण्यासाठी गाणं लिहावं लागले.