शिवसैनिकांचं मुंबई महापालिकेविरोधात अनोखं आंदोलन

मुंबईच्या पवई विभागत असलेल्या प्रशांत अपार्टमेंट इथल्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम गेले तीन महिने रखडले आहे.

Updated: Feb 11, 2018, 11:16 PM IST
शिवसैनिकांचं मुंबई महापालिकेविरोधात अनोखं आंदोलन   title=

मुंबई : मुंबईच्या पवई विभागत असलेल्या प्रशांत अपार्टमेंट इथल्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम गेले तीन महिने रखडले आहे. याचा निषेध म्हणून पवईमधील नागरिक आणि शिवसैनिकांनी या खोदून ठेवलेल्या रस्त्यावर चक्क रांगोळी काढून पालिका प्रशासनाचा निषेध केला.

पवई पोलीस बिट चौकी, आयआयटी मेनगेट ते पुंडलिक वीलापर्यंतचा रस्ता पालिकेच्या सेंट्रल एजन्सीतर्फे दुरुस्तीसाठी खोदून ठेवण्यात आला आहे. परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम ठप्प पडून आहे. यामुळे नागरिकांना  मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. या बाबत स्थानिक नागरिक आणि शिवसेनेतर्फे वारंवार पाठपुरावा करून देखील हे काम पूर्ण झाले नाही. अखेर स्थानिक नागरीक आणि शिवसैनिकांनी या रस्तावर रांगोळ्या काढून अनोखं आंदोलन केलं.