मुंबई : सायनच्या प्रतीक्षानगरमध्ये आज सकाळी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले.
महापालिकेनं बांधलेल्या रस्त्याच्या उद्घाटनावरून दोघा पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरादार वाद झाला. रस्त्याच्या शुभारंभ करण्यावरून शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर आणि भाजपचे आमदार तमिल सेल्वन यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळं परिसरात तणाव निर्माण झाला होता. प्रतीक्षानगरमधील या रस्त्याचं उद्घाटन दोन दिवसांपूर्वीच होणार होते. मात्र शिवसेना नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांच्या निधनामुळे पालिकेचा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.
सायन प्रतीक्षानगर येथील प्रभाग क्रमांक १७३चे शिवसेनेचे नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांचे बुधवारी हृदयविकाराचा तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर केईएम रूग्णालयात उपचार सुरू होते. अखेर बुधवारी सकाळी सात वाजल्याच्या सुमारास रूग्णालयात त्यांचे निधन झाले.
गेल्या वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांच्यावर प्रभाग समितीचे अध्यक्षपदही सोपविण्यात आले. काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना आठवडाभरापूर्वी केईएम रुग्णालयात हलविण्यात आले.