सावज टिपायला बंदुकीची गरज नाही; सावज दमलंय: उद्धव ठाकरे

 एखादी गोष्ट चुकत असेल, तर ती परखडपणे सांगणारा खरा मित्र असतो, असं उद्धव ठाकरे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

Updated: Jul 23, 2018, 08:57 AM IST
सावज टिपायला बंदुकीची गरज नाही; सावज दमलंय: उद्धव ठाकरे title=

मुंबई:  'सावजाची शिकार मीच करीन. त्यासाठी दुसऱ्याची बंदूक वापरणार नाही. पण आता बंदुकीची गरज लागणार नाही. सावज दमलंय', अशा शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक हल्ला चढवला. उद्धव यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ला प्रदीर्घ मुलाखत दिली. त्यात त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला लक्ष्य केलं.

आपली मैत्रीची व्याख्या वेगळी

सत्तेतून राहून मित्रपक्षावर टीका करणाऱ्या शिवसेनेची अनेकदा खिल्ली उडवली जाते. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपली मैत्रीची व्याख्या वेगळी असल्याचं म्हटलं. एखादी गोष्ट चुकत असेल, तर ती परखडपणे सांगणारा खरा मित्र असतो, असं उद्धव ठाकरे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

अविश्वास ठरावावेळी तटस्थ राहण्याबद्धल उद्धव म्हणाले...

दरम्यान, केंद्र सरकारविरोधात आलेल्या अविश्वास प्रस्तावावेळी शिवसेना तटस्थ राहिली. या मुद्द्यावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा...