शिवसेना माजी खासदार मोहन रावले यांचे निधन

शिवसेना नेते मोहन रावले यांचे निधन

Updated: Dec 19, 2020, 11:33 AM IST
शिवसेना माजी खासदार मोहन रावले यांचे निधन title=

मुंबई : शिवसेना नेते मोहन रावले यांचे निधन झालंय. मोहन रावले हे शिवसेनेचे माजी खासदार असून दक्षिण मध्य मुंबईतून पाच वेळा निवडून आले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जात.

हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर येतेय. दक्षिण मुंबईत शिवसेना रुजवण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. शिवसेनेतील बड्या नेत्यांपासून ते शिवसैनिकांपर्यंत प्रत्येकाशी त्यांचा दांडगा संपर्क होता. काही कामानिमित्त ते गोव्यात होते. त्यावेळी त्यांना हृदय विकाराचा झटका आला. मोहन रावले यांचे पार्थिव आज मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी आणले जाणार आहे.