'त्या' पक्षाच्या १०० जणांची नावं उघड करतो, संजय राऊतांचे आव्हान

ज्या पक्षाच्या आदेशाने ईडी वागत आहेत. त्या पक्षाच्या १०० जणांची नावं देतो असे आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलंय. 

Updated: Nov 24, 2020, 02:00 PM IST
'त्या' पक्षाच्या १०० जणांची नावं उघड करतो, संजय राऊतांचे आव्हान

मुंबई : ज्या पक्षाच्या आदेशाने ईडी वागत आहेत. त्या पक्षाच्या १०० जणांची नावं देतो असे आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलंय. त्यांचे धंदे, उद्योग काय आहेत, मनी लॉंड्रींग कसं चालतं, निवडणुकीत पैसा कसा येतो ?, कसा वाटला जातो ?, कुणाच्या माध्यमातून येतो याची महिती ईडीला नसेल मात्र आम्हाला आहे असे राऊत म्हणाले. 

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून महाराष्ट्र सरकार दाबावाखाली येईल असं वाटतं असेल. तर आम्ही कोणाला शरण जाणार नाही. हे सरकार २५ वर्ष राहील. ईडी किंवा अन्य संस्था यांनी राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणे काम करू नये असा टोला राऊतांनी लगावला. 

गेल्या काही वर्षात केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था, कायदा हा अलीकडच्या सत्ताधाऱ्यांच्या गुलामासारखा वागत आहे. कितीही दहशत निर्माण करा, काळ्या दगडावरची रेष समजा तुमचं सरकार २५ येईल हे विसरून जा. तुम्ही सुरुवात केली पण शेवट कसा करायचा आम्हाला माहीत असल्याचे राऊत म्हणाले. 

आमचा प्रत्येक आमदार, खासदारांच्या, नेत्यांच्या घरासमोर, कार्यालयासमोर ईडीनं कार्यालय दुकान थाटलं तरी घाबरत नाही असे राऊत म्हणाले.

ईडीनं भाजपा कार्यालयात शाखात उघडली असेल,हिंमत असेल तर अटक करा. इंटरपोल ची टीम आली तरी चालेल. एकदिवस हे उद्योग त्यांच्यावरच उलटतील असेही राऊत म्हणाले.

यावर विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली. संजय राऊतांनी १०० जणांच्या नावांची यादी ईडीकडे द्यावी. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन मी देतो असे प्रतिआवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांना दिले.