धक्कादायक | परदेशातून कल्याण-डोंबिवलीत आलेल्या त्या 6 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. परदेशातून कल्याण डोंबिवलीत आलेल्या 6 जणांचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे.  

Updated: Dec 4, 2021, 08:50 PM IST
धक्कादायक | परदेशातून कल्याण-डोंबिवलीत आलेल्या त्या 6 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

मुंबई : राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. परदेशातून कल्याण डोंबिवलीत आलेल्या 6 जणांचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तसेच लोकांमध्येही भितीचं वातावरण आहे. (Shocking 6 people who returned from foreign country Tested positive in Kalyan Dombivali but jinom sequencing report pending) 
    
परदेशातून आलेल्या या 6 जणांना आवश्यक त्या उपचारांसाठी विलिगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. यांच्यावर उपचार केले जात आहेत. या 6 जणांपैकी 4 नागरिक नायजेरियातून आले होते. तर  उर्वरित 2 जण हे रशिया आणि नेपाळमधून आले होते. काहीशी दिलासादायक बातमी अशी की हे 6 जण हाय रिस्क देशातून आलेले नाहीत. 

कोरोनाचा नवा व्हेरिएंट अर्थात ओमायक्रॉन ज्या ज्या देशात आढळला आहे, त्यापैकी काही देशांना हाय रिस्क या यादीत विभागणी करण्यात आली आहे. मात्र हे 6 जण त्या देशातून आलेले नाहीत. 

रशिया, नेपाळ, नायजेरिया हाय रिस्क देशांच्या यादीत नाहीत, अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनानं दिली आहे. हायरिस्कमध्ये दक्षिण आफ्रिका, झिंबाब्वे, बोत्सवाना यासारख्या देशांचा समावेश आहे. 

दरम्यान ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कसून चौकशी केली जात आहे. आतापर्यंत मुंबईत परदेशातून काही हजारो प्रवाशांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यापैकी मुंबईत आतापर्यंत यांपैकी 10 जण कोविड पॉझिटीव्ह सापडलेत. 

चिंताजनकक बाब म्हणजे या 10 पैकी 9 जण हे रिस्क कंट्रीमधील आहेत. या 9 जणांना कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनची लागण आहे की नाही हे सोमवारपर्यंत कळणार आहे. या पॉझिटिव्ह रुग्णांची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी करण्यात आली आहे.