आनंद पोटात ‌माझ्या‌ मावेना; मनसेकडून सिद्धीविनायकाची‌ आरती

राज्यातील मंदिर आजपासून खुली 

Updated: Nov 16, 2020, 08:43 AM IST
आनंद पोटात ‌माझ्या‌ मावेना; मनसेकडून सिद्धीविनायकाची‌ आरती title=

मुंबई : राज्य सरकारने आज मंदिरे खुली केली आहे. या आनंदात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांकडून सिद्धीविनायकाच्या बाहेर आरती (Siddhivinayak Temple) केली आहे. मनसे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी इतर कार्यकर्त्यांसह मंदिराबाहेर आरती केली. तसेच प्रसाद वाटप करून मंदिर खुली झाल्याचा आनंद व्यक्त केला. 

जवळपास सात ते आठ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर दिवाळी Diwali 2020 पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरं पुन्हा खुली करण्याची परवानगी शासनातर्फे देण्यात आली आहे. मंदिरं खुली करण्याची परवानगी देण्यात आलेली असली तरीही कोरोनापासून बचावासाठी शक्य त्या सर्व परिंनी काळजी घेतली जाणार आहे. 

सिद्धीविनायक मंदिर खुले करण्याचा आजचा पहिला दिवस. सगळे नियमाप्रमाणे सुरू करण्यात येणार आहे. मंदिरा बाहेर क्यूआर कोडची व्यवस्था आहे. ते घेऊनच आतमध्ये प्रवेश मिळतोय. तासाला १०० भाविकांना प्रवेश आहे. आज याचा आढावा घेऊन नंतर संख्या वाढवत नेणार असल्याची माहिती सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले. 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरं खुली करण्याची घोषणा केल्यानंतर आता मंगल पर्वातच पुन्हा एकदा देवाच्या दारी जाऊन भाविकांना दर्शन घेता येणार आहे. पण त्यासाठी मंदिरात येताना भाविकांनी मास्क लावणं, सोशल डिस्टनसिंग पालन करणं, आरोग्य सेतू ऍप वापरणं आवश्यक असून, कोरोनाच्या नियमांचं पूर्ण पालन करणं अशा अटी राज्य सरकारकडून लागू करण्यात आल्या आहेत.