जिवंत सापांच्या पुजेवर उच्च न्यायालयाचा निर्वाळा

नागपंचमीला प्रत्येक वर्षी हजारो जिवंत साप पकडले जातात, त्यांना क्रुरतेने हाताळलं जातं, यावरून ३ वर्षापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने बंदी आणली होती.

Updated: Jul 22, 2017, 11:13 AM IST
जिवंत सापांच्या पुजेवर उच्च न्यायालयाचा निर्वाळा title=

मुंबई : नागपंचमीला जिवंत सापांची पूजा करण्यावर मुंबई हायकोर्टाने बंदी कायम ठेवली आहे. नागपंचमीला प्रत्येक वर्षी हजारो जिवंत साप पकडले जातात, त्यांना क्रुरतेने हाताळलं जातं, यावरून ३ वर्षापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने बंदी आणली होती, ती बंदी आजही उच्च न्यायालयाने कायम असल्याचा निर्वाळा दिला आहे.

सांगलीतील बत्तीस शिराळा गावात नागपंचमीला जिवंत सापांची पुजा केली जाते, हे गाव त्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र नागपंचमीला हजारो सापांची देखील शिकार होते, ही प्रथा ताबडतोब बंद करण्यासाठी सापांविषयी जनजागृती करण्याच्या सूचना राज्य सरकारला देण्यात आल्या आहेत.

जिंवत सापांच्या पुजेवरील बंदी उठवण्यासाठी प्रदीप जोशी यांनी हायकोर्टात याचिका केली होती, मात्र यापूर्वीच्या आदेशात कोणताही बदल न करता न्यायालयाने ही बंदी कायम ठेवली आहे.  येत्या 27 जुलैला नागपंचमीचा हा सण साजरा होणार आहे.