मुंबई : शारदा भवन हे नाव तसं एखाद्या घराचं वाटत असलं, तरी हे एका लोकप्रिय रेस्टॉरंटचं नाव आहे, येथे तुम्हाला निवांत बोलता येईल अशी जागा आहे. माटुंग्यात हे ठिकाण आहे. संपूर्ण पत्ता तुम्हाला व्हिडीओत पाहता येईल.
शारदा भवनच्या खाण्याची, चवीची स्वत:ची अशी एक खासियत आहे. इतर साऊथ इंडियन रेस्ट्रॉरंटमध्ये लागते, त्या चवीपेक्षा वेगळी चव आणि भरपूर साऊथ इंडियन चटणीसोबत चाखता येण्याची संधी येथेच आहे.
येथे खाणाऱ्यांचे आवडते पदार्थ देखील वेगवेगळे आहेत. फक्त मध्यम वयातले नाही, तर तरूणांचंही हे आवडतं ठिकाण आहे. तुम्हाला गरमा गरम डोसा आणि ते देखील कमी किंमतीत आणि चांगल्या दर्जाचे येथे चाखता येतील.
दररोजच्या मुंबईच्या गर्दीत आणि धावपळीत सामिल होण्याआधी तुम्हाला खाता खाता येथील निवांतपणा उर्जा देऊन जातो आणि तुम्ही येथून थेट निघू शकतात रोजच्या धकाधकीला.