महापौर किशोरी पेडणेकर यांच्या पत्राची राज्य महिला आयोगाने घेतली दखल; पोलिसांना दिले हे आदेश

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. या पत्राची दखल घेण्यात आली आहे.

Updated: Feb 21, 2022, 07:32 PM IST
महापौर किशोरी पेडणेकर यांच्या पत्राची राज्य महिला आयोगाने घेतली दखल; पोलिसांना दिले हे आदेश title=

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. या पत्राची दखल घेण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र पोलिसांना योगात ते आदेश देण्यात आल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलीय. 

दिशा सालियान या सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होत्या. तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला नव्हता. त्यावेळेस ती गरोदर देखील नव्हती, असे तिच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

दिशा सालियान हिच्या शवविच्छेदन अहवालास तिच्या आईवडिलांनी दुजोरा दिला आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिशा सालियान हिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला. ही बाब अतिशय दुर्दैवी व वेदनादायक आहे.

 

मृत्यूनंतरही दिशा सालियान यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली आहे. त्यांच्या या पत्राची दाखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस स्टेशन यांना ४८ तासांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.