मिस वर्ल्ड मानुषीच्या स्वागतासाठी विद्यार्थी रस्त्यावर ताटकळले...

मुंबई पालिकेच्या विद्यार्थ्यांना एखाद्या कार्यक्रमानिमित्त कसं जुंपल जातं, याच उदाहरण आज पाहायला मिळालं.

Updated: Dec 2, 2017, 04:34 PM IST
मिस वर्ल्ड मानुषीच्या स्वागतासाठी विद्यार्थी रस्त्यावर ताटकळले... title=

मुंबई : मुंबई पालिकेच्या विद्यार्थ्यांना एखाद्या कार्यक्रमानिमित्त कसं जुंपल जातं, याच उदाहरण आज पाहायला मिळालं.

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हिच्याशी आज मुंबईत प्रभादेवी इथल्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेतला.

या कार्यक्रमाआधी प्रभादेवी इथे बेस्टच्या 'निलांबरी' बसमधून मानुषी छिल्लरसाठी छोटेखानी मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. यासाठी विद्यार्थ्याचे बँड पथक, लेझीम पथक तैनात करण्यात आले होते. 

मात्र, सकाळी १०.०० वाजता नियोजित करण्यात आलेला कार्यक्रम तब्बल ४० मिनिटे उशिरानं सुरू झाला. यासाठी विद्यार्थ्यांना सुमारे एक तासापेक्षा जास्त वेळ भर रस्त्यात प्रतीक्षा करायला लागली होती.

ताटकळत असलेल्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर बसून विश्रांती घेतली. सकाळची वेळ आणि त्या परिसरांत सावली असल्याने सुदैवाने फारसा त्रास झाला नाही.