मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी सुहास पेडणेकर

 मुंबई विद्यापीठाला अखेर सहा महिन्यांनंतर नवा कुलगुरू मिळला आहे.

Updated: Apr 27, 2018, 04:53 PM IST

मुंबई : मुंबई विद्यापीठाला अखेर सहा महिन्यांनंतर नवा कुलगुरू मिळला आहे. मुंबईतल्या रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य सुहास पे़डणेकर यांच्या नावाची घोषणा राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केलीय. अंतिम यादीत पेडणेकर यांच्यासह नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रमोद येवले, मुंबई विद्यापीठाच्या गरवारे संस्थेचे संचालक अनिल कर्णिक, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व्ही एस सपकाळ यांची निवड करण्यात आली होती. मात्र पेडणकरांच्या गळ्यात कुलगुरूपदाची माळ पडली आहे.

रसायनशास्त्राचे प्राध्यापक तसेच माटुंग्याच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुहास रघुनाथ पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी शुक्रवारी डॉ. पेडणेकर यांना राजभवन येथे बोलावून नियुक्तीचे पत्र सुपूर्द केलं. 

डॉ. पेडणेकर यांची नियुक्ती कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील तोपर्यंत (यापैंकी जे अगोदर असेल ते) करण्यात आली आहे.

गेल्यावर्षी दिनांक २४ ऑक्टोबर रोजी डॉ संजय देशमुख यांना

कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. डॉ श्यामलाल सोनी, संचालक, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, पौडी गढवाल, उत्तराखंड व भूषण गगराणी, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको हे समितीचे अन्य सदस्य होते.