मुंबई : 'तुमच्या काळात गुंडांना मोकळं रान मिळाले आहे का?, राज्याला स्वतंत्र गृहमंत्र्यांची आवश्यकता असल्याचं स्पष्ट झालं आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केलं आहे. 'झी २४ तास'च्या वृत्त निवेदकाला पिस्तुलाचा धाक दाखवून, पुणे-मुंबई प्रवासादरम्यान लुटलं, अशा घटना वारंवार घडत आहेत, म्हणून राज्याला स्वतंत्र गृहमंत्र्यांची आवश्यकता असल्याचं आता स्पष्ट झालं आहे, तसेच तुमच्या काळात गुंडांना मोकळ रान मिळालं आहे का? असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
'झी २४ तास'चे वृत्त निवेदक गिरीश निकम हे वैद्यकीय कामासाठी पुण्याला गेले होते, त्यांना पुण्यात ते स्वारगेट बसस्टॅण्डला मुंबईला येण्यासाठी आले होते. बसची वाट पाहत असताना, आपल्या गाडीत एक जण हवा आहे, तेव्हा तुम्ही या, फक्त ३०० रूपये भाडे द्या, असं त्यांना सांगण्यात आलं. यावरून गिरीश निकम हे त्या गाडीत बसले, पण अर्ध्या वाटेत त्यांच्या डोक्याला पिस्तुल लावण्यात आलं.
सविस्तर बातमी पिस्तूलचा धाक दाखवून 'झी २४ तास'च्या वृत्त निवेदकाला लूटलं
.@zee24taasnews च्या पत्रकाराला पुणे-मुंबई प्रवासादरम्यान पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले. अशा घटना वारंवार घडत आहेत.हे गंभीर आहे.@CMOMaharashtra आपल्या काळात गुंडांना मोकळे रान मिळाले आहे का? या राज्याला स्वतंत्र गृहमंत्र्याची आवश्यकता असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले. https://t.co/Lb9HwjPRjS
— Supriya Sule (@supriya_sule) July 19, 2018
गिरीश निकम यांच्या गळ्यातील सोन साखळी या गुंडांनी काढून घेतली. गिरीश यांना मारहाण देखील या गुंडांनी केली. गिरीश यांच्याकडून एटीएम कार्ड घेतलं, त्यांना पिनकोड विचारण्यासाठी डोक्याला पिस्तुल लावलं, यानंतर एटीएममधून त्यांनी ४१ हजार रूपये कॅश देखील काढली. यानंतर डोळ्याला पट्टी बांधून गिरीश यांना या गुंडांनी कळंबोली येथे सोडून दिलं.