मुंबईकरांच्या खिशाला आणखी झळ; रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार

महागाईमुळे सर्व सामान्य जनतेचा महिन्याचा बजेट कोलमडला आहे.   

Updated: Feb 22, 2021, 07:15 PM IST
मुंबईकरांच्या खिशाला आणखी झळ; रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महागाई गगनाला भिडली आहे. महागाईमुळे सर्व सामान्य जनतेचा महिन्याचा बजेट कोलमडला आहे. त्यात आणखी भर पडणार आहे. ऐन महागाईत मुंबईकरांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. कारण मुंबई महानगर परिसरातील रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीला राज्य सरकारनं मंजुरी दिलीय. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आता तीन रुपयांनी महागणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्य़ामुळे सर्वसामान्यांचा प्रवास देखील महागला आहे.

रिक्षाच्या पहिल्या टप्प्यासाठी आता १८ ऐवजी 21 रूपये मोजावे लागणार आहेत. तर टॅक्सीसाठी 22 ऐवजी 25 रूपये मोजावे लागणार आहेत. सहा वर्षांनंतर ही भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आमच्याकडे कोणतेही वाहन नाही म्हणणाऱ्यांच्या खिशाला देखील चटका लागणार आहे. 

दरम्यान, कोरोनाचा फटका सर्वांनाच बसला आहे. कोरोना काळात सर्व काही बंद होतं. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी चालकांवर मोठं संकट आलं होतं. मात्र आता सरकारने भाडेवाढीला मान्यता दिल्यामुळे चालकांनी आनंद व्यक्त केला आहे. परंतु या भाडेवाढीचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिश्यावर होणार आहे.