Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटासाठी (Shinde Group) नाव जाहीर केली आहेत. उद्धव ठाकरे गटासाठी 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) नाव देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' (Balasaheb Shivsena) हे नाव देण्यात आलं आहे.
ठाकरे गटाचं चिन्हही ठरलं
उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालं आहे. ठाकरे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला होता. यापैकी ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा चिन्हांचा पर्याय देण्यात आला होता. पण उगवात सूर्य हे तामिळनाडूतील पक्षाचं चिन्ह आहे त्यामुळे ते देता येणार नसल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. त्यामुळे शिंदे गटाला नव्या चिन्हांचा पर्याय द्यावा लागणार आहे.
ठाकरे गटाकडून नावांचे तीन पर्याय
धनुष्यबाण चिन्हाबरोबर शिवसेना हे नावही वापरता येणार नसल्याने ठाकरे गटाकडून तीन नावांचा पर्याय देण्यात आला होता. यात
१.शिवसेना बाळासाहेब ठाकरे
२. शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे
३. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा तीन नावांचा पर्याय देण्यात आला होता. यापैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव निश्चित करण्यात आलं आहे. आता अंधेरी पोटनिवडणूक ठाकरे गट याच नावावर लढवणार आहे.
शिंदे गटाकडून नावांचे तीन पर्याय
शिंदे गटाकडून (Shinde Group) तीन नावाचा प्रस्ताव देण्यात आला होता. आपल्या पक्षाच्या नावात बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. यात
१. बाळासाहेब ठाकरे
२. बाळासाहेबांची शिवसेना
३. शिवसेना बाळासाहेबांची
अशा तीन नावांचा पर्याय देण्यात आला होता. यापैकी दुसरा म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलं आहे.
1985 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेनं धनुष्यबाण या चिन्हावर पहिल्यांदा जिंकली. त्यानंतर चार वर्षांचा अपवाद वगळता गेली ३७ वर्षं शिवसेना आणि धनुष्यबाणाचीच सत्ता मुंबईवर राहिलीय..