हत्याकांडाच्या घटनेनं वसई पुन्हा हादरलं; बॅगेत सापडला शिर नसलेल्या महिलेचा मृतदेह

वसईच्या सुरुची  समुद्रकिनारी आज दुपारी एका बॅगेत महिलेचा मृतदेह आढळला आहे. 

Updated: Jul 26, 2021, 03:28 PM IST
हत्याकांडाच्या घटनेनं वसई पुन्हा हादरलं; बॅगेत सापडला शिर नसलेल्या महिलेचा मृतदेह

वसई : वसईच्या सुरुची  समुद्रकिनारी आज दुपारी एका बॅगेत महिलेचा मृतदेह आढळला आहे. विशेष म्हणजे सदर मृतदेहाची मान कापलेल्या अवस्थेत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

वसई पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन अहवालासाठी पाठवून दिला आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास केला जात आहे.

-----------------
Crime | वसईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; लाखो रुपयांचे कंडोम जप्त

वसई : वसई शहर आणि परिसरातील गुन्ह्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना, लॉकडाऊन, नैसर्गिक आपत्ती इत्यादींमुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. तरीसुद्धा वसई परिसरातील गुन्हेगारी कमी होत नसल्याचे समोर आले आहे. शहरात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या तृतीयपंथी महिलेला अटक करण्यात आली आहे.

वसई शहरात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या तृतीयपंथी महिलेला पोलिसांनी रंगे हात पकडले आहे. पोलिसांनी सापळा रचून या महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. 

पोलिसांनी खबर लागताच त्यांनी पेल्हार परिसरात खान कंपाऊंडमध्ये छापा टाकला. यावेळी केलेल्या कारवाईत 2 लाख 60 हजारांचे कंडोम जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सोशलमीडियावरून हे सेक्स रॅकेट चालवले जात होते. या रॅकेटचा वालीव पोलीस अधिक तपास करीत आहे.