राज्यात ब्रिटनमधील नव्या कोरोनामुळे डोकेदुखी वाढवली

कोरोनाच्या (coronavirus) प्रसारावर सरकारनं नियंत्रण मिळवलं असतांना आता ब्रिटनमधल्या ( Britain) नव्या कोरोनामुळे (Corona's new strain) डोकेदुखी वाढवली आहे.

Updated: Jan 8, 2021, 09:03 PM IST
राज्यात ब्रिटनमधील नव्या कोरोनामुळे डोकेदुखी वाढवली  title=
संग्रहित छाया

अमित जोशी / मुंबई : कोरोनाच्या (coronavirus) प्रसारावर सरकारनं नियंत्रण मिळवलं असतांना आता ब्रिटनमधल्या ( Britain) नव्या कोरोनामुळे (Corona's new strain) डोकेदुखी वाढवली आहे. ब्रिटनहून ( Britain) आलेल्या प्रवाशांची तपासणी, बधितांचे विलीगिकरण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांचं ट्रेसिंग-टेस्टिंग करण्यात आले आहे. आता पुढले काही दिवस महत्त्वाचे असतील. 

राज्यात काही आठवड्यांपूर्वीच दररोज 20 हजारांच्या घरात कोरोनाचे रुग्ण सापडत होते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये हा आकडा बराचसा खाली आलाय. आता रोज सरासरी 3 ते 4 हजार रुग्ण सापडतायत... त्यामुळे परिस्थिती काहीशी नियंत्रणात आल्याचं चित्र निर्माण झालं, तोच ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेननं चिंता वाढवलीये... कोविड 19पेक्षा हा नवा B 117 स्ट्रेन अधिक धोकादायक आहे, कारण तो लवकर पसरतो आणि जास्त घट्ट पकडतो. 

ब्रिटनमधील स्ट्रेननं चिंता वाढवली असली तरी आता राज्य सरकार गाफिल नाहीये... ब्रिटनहून आलेल्या रुग्णांना ट्रेस केलं गेलंय आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांचीही चाचणी झालीये. आरोग्य खाते सज्ज आहे. याबाबत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, ब्रिटनहुन आलेले किती जण बाधित आहेत, पुरेशी काळजी घेतलेली आहे.

खरंतर जानेवारीपासून अनलॉकची प्रक्रिया अधिक वेगाने होण्याची अपेक्षा होती. लोकल, शाळा सुरू होण्याची आशा होती. मात्र ब्रिटनमधील स्ट्रेनमुळे आता हा निर्णय लांबणीवर टाकावा लागला आहे. दुर्घटना से देर भली त्यामुळे सरकार सावध आहे. तुम्हीही सावध राहा, संकट टळलेले नाही, एवढेच सांगणे आहे.