close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

खोटेपणाचे राजकारण या राज्यात झालेले नाही - संजय राऊत

देवेंद्र फडवणीस यांना शिवसेनेचे संजय राऊत यांनी पुन्हा टोला लगावला. 

Updated: Nov 9, 2019, 11:03 AM IST
खोटेपणाचे राजकारण या राज्यात झालेले नाही - संजय राऊत
संग्रहित छाया

मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. खोटेपणा, ढोंगाचे राजकारण चालत नाही, त्याचा काल शेवट झाला आहे. खोटपणाचे राजकारण करणाऱ्यांचे सरकार येणार नाही, याचा आम्ही निर्णय घेतला आहे. खोटेपणाचे राजकारण राज्यात याआधी कधी झालेले नाही, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना शिवसेनेचे संजय राऊत यांनी पुन्हा टोला लगावला. 

उद्धव ठाकरे यांनी काल हातोडा मारला आहे, त्यांचे निवेदन ऐतिहासिक होते. संताप, उद्रेक पाहायला मिळाला. तो खोटेपणाविरोधात आहे. त्यामुळे या विषयावर आता मी बोलणार नाही. आजचा दिवस कोणत्याही राजकीय घडामोडींचा नाही. उद्धव ठाकरे यांना खोटे पाडणार असाल तर ते सहन केले जाणार नाही, असे ते म्हणालेत.

महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील संताप बाहेर आला आहे. महाराष्ट्रात खोट्याचे राजकारण सुरु आहे. राज्यात याआधी कधीही खोटे राजकारण चालू दिले नाही. उद्धव ठाकरेंचे हे रुप पाहून आम्हीही आश्चर्यचकीत झालो, अशा शब्दात संजय राऊत यांनी त्यांचे कौतुक केले.