close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, चौघांना अटक

 एका उच्चभ्रू वस्तीत असणाऱ्या एका मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. 

Updated: Jan 10, 2019, 06:24 PM IST
मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, चौघांना अटक
संग्रहित छाया

मुंबई : एका उच्चभ्रू वस्तीत असणाऱ्या एका मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. पोलिसांनी मॉलमधील स्पा सेंटरवर छापा मारला. यावेळी दोन महिला आणि दोन पुरुषांना ताब्यात घेतली. अधिक चौकशीतून या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. वसई पोलिसांनी एका स्पा सेंटरवर छापा मारला. या स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसहित दोन पुरूषांना अटक केली आहे. वसईच्या दत्तानी मॉलमध्ये गोल्डन परी नावाचे हे स्पा सेंटर सुरु होते. या ठिकाणी मोबाईलवर संपर्क करून वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवल्या जात होत्या, अशी माहिती पोलिसांनी मिळाली होती. याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी या स्पा सेंटरवर छापा मारला. त्यावेळी या स्पामध्ये दोन पुरुष आणि दोन महिला आढळून आल्यात. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट नावाने एक ग्राहक पाठविले. त्यावेळी इथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खातरजमा झाली. त्यानंतर पोलिसांनी छापा मारला. मागील दोन महिन्यांपासून हे स्पा सेंटर सुरु झाले होते. उच्चभ्रू वस्तीत मॉल असून या मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती या निमित्ताने पुढे आली आहे. त्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.