सीसीटीव्हीत खादाड चोरटे चित्रीत

आईस्क्रीम खात आणि कोल्ड्रिंक पीत चोरट्यांचा दुकानावर डल्ला  

Updated: Nov 20, 2019, 06:37 PM IST
सीसीटीव्हीत खादाड चोरटे चित्रीत title=

कल्याण : सोनं, चांदी, दागिने, महागड्या गाड्या लंपास करण्याचे प्रकार तर सर्रासपणे घडत असतात. पण आइस्क्रिम आणि कोल्ड्रिंकच्या बाटल्या चोरीला गेल्याची बातमी तुम्ही कदाचीत पहिल्यांच ऐकली असेल. कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोडवर असणाऱ्या आईस्क्रीम आणि झेरॉक्सच्या दुकानात हा प्रकार घडला आहे. चोरट्यांनी तब्बल १० हजार रूपयांचा माल हस्तगत करून पलायन केले आहे. 

विशेष म्हणजे या चोरट्यांनी चक्क आईस्क्रीम खात खात आणि कोल्ड्रिंक पीत पीत दुकानावर डल्ला मारला. चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलीस या खादाड चोरट्यांचा शोध घेत आहेत. 

या चोरट्यांनी दुकानातील विविध कंपन्यांचे आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंकच्या बाटल्या चोरल्या आहेत. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या खादाड चोरट्यांचा शोध घेत आहेत.