Mumbai Viral Video : दारुच्या नशेत तरुणीने ओलांडली मर्यादा, पोलीस कर्मचाऱ्यासोबत...

Mumbai Viral Video : सोशल मीडियावर एका तरुणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. दारुच्या नशेत त्या तरुणी रस्त्यात पोलिसांसोबत असं काही केलं की, तिचं हे कृत्य पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. 

Updated: Feb 1, 2023, 03:44 PM IST
Mumbai Viral Video : दारुच्या नशेत तरुणीने ओलांडली मर्यादा, पोलीस कर्मचाऱ्यासोबत... title=
Trending Video mumbai Drunken girl crossed the limit along with a MUMBAI POLICE man Video Viral on Social media

Girl Viral Video : सोशल मीडियावर (Social Media Video) वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतं असतात. लहान मुलांचे, माहितीपूर्ण, प्राण्यांचे, अपघाताचे किंवा स्टंट करताना धक्कादायक आणि भीतीदायक व्हिडीओ पाहिला मिळतात. सोशल मीडियावर हा अनेक वेगवेगळ्या व्हिडीओचा खजिना आहे. मुंबईतील (Mumbai Video)अनेक व्हिडीओ रोज व्हायरल (Viral Video) होतं असतात. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ नेटकऱ्यांना हैराण करत आहे. दारुच्या नशेत (Drunk Girl Viral Video) या तरुणीने पोलीस कर्मचाऱ्यासोबत (Mumbai Police) केलेलं कृत्य पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. 

तरुणीने ओलांडली मर्यादा! 

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुणी खूप जास्त मद्यधुंद अवस्थेत आहे. तरुणी पोलीस कर्मचाऱ्यासोबत अंगलगट करताना दिसत आहे. पोलीस कर्मचारी तिला दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र ती तरुणी चिडते आणि पोलिसाला लाथ मारत...शिवीगाळ करते. त्या पोलिसाच्या चेहऱ्यावरील मास्क काढून फाडून टाकते. पुढे व्हिडीओमध्ये एक तरुणी त्या तरुणीला सांभाळण्याचा प्रयत्न करत असते. पण ती रस्त्यावर खाली पडते. (Trending Video mumbai Drunken girl crossed the limit along with a MUMBAI POLICE man Video Viral on Social media)

हा सगळा तमाशा मुंबईकर पाहत असतात. ती रस्त्यावर लोळते उठून बसते आणि सगळ्यांना शिवीगाळ करत राहते. तुम्ही पाहू शकता मुंबई पोलीस त्या तरुणीचा तमाशा पाहून हैराण झालेले असतात. दारूच्या नशेत रस्त्यावर तरुणीचा तमाशा पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. मात्र, हा व्हिडीओ जुना असून सध्या सोशल मीडियावर परत धुमाकूळ घालतोय. आतापर्यंत लाखो यूजर्सने हा व्हिडीओ पाहिला आहे. तर अनेक कमेंट्स येतं आहेत. एका यूजरने लिहिले की, 'दारूचा नशा खूप वाईट आहे.' त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, 'पोलीस कर्मचाऱ्याला लाथ मारायला नको होती'.  दुसरा म्हणतो की, 'पोलीस आता तिला चांगलाच धडा शिकवतील.'